40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

आमचे सोबती

साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ पुणे

परिचयोत्तर विवाह संस्था

आजकालच्या तरुण मुलामुलींच्या जोडीदार निवडीविषयीच्या कल्पना बदलत आहेत. या बदलत्या कल्पनांमध्ये नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने स्थळ शोधून, दाखवून-बघून, थोडक्या वेळात होणार्‍या अत्यल्प ओळखीवर परस्परांचा आयुष्यभराचा जोडीदार बनणं त्यांना नको वाटतं आहे. प्रेमविवाह किंवा आपापले परिचयोत्तर विवाह ठरवता आलेले नाहीत अशांना इतर पर्याय दिसत नाहीत.त्यामुळे चालू रीतिलाच शरण जाणं भाग पडत आहे.

अशा स्थितीत साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ विवाहेच्छूक तरुणींना एका व्यासपीठावर एकत्र आणून त्यांना बोलतं करतं. प्रत्ेक रविवारी संस्थेमध्ये वेगवेगळे उपक‘म आयोजित केले जातात. विविध विषयावर मनमोकळ्या गप्पा, पुस्तक/नाटक/चित्रपट इ. वर चर्चा, वादविवाद, रोजच्या जीवनातील विविध घटनांवर बेतलेली प्रसंगनाट्यं, खेळी, सहली, शिबिरं, कार्यशाळा, प्रश्‍नावली, लिखाण असे विविध उपक‘म असतात. या निि’त्तानं होणार्‍या विचारांच्या देवाण-घेवाणीतून ह्या विवाहेच्छुक तरुण-तरुणींना आधी स्वतःला समजून घेण्याची आणि मग इतरांना ओळखण्याची आणि त्यातून स्वतःसाठी सुयोग्य जोडीदार निवडण्याची संधी मिळते.

विवाहपूर्व समुपदेशनाची सेवाही साथ-साथ मध्ये उपलब्ध आहे. आपल्या मनातलं कुणाशी तरी मनमोकळेपणानं बोलावं असे तरुण तरुणींना वाटत असतं, ती संधी साथ-साथ मध्ये मिळते.

जोडीदार निवडण्याची नवी वाट शोधू पाहणार्‍या आणि वेगळ्या विचाराने चालू इच्छिणार्‍या विवाहेच्छू तरुण तरुणींना मैत्रीपूर्ण आणि अनौपचारिक वातावरणात परिचयोत्तर विवाहाची संधी देणारी एकमेव विवाह संस्था साथ साथ.

गुरुवार संध्या. 6.00 ते 8.00 रविवार सकाळी 10.30 ते 12.30

मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, लेक्चर हॉल नं. 1, बी ए’ सी सी रोड, डेक्कन जिमखाना, पुणे. मोबाईल नं. :- (+91) 9850 983 784.

नारी समता मंच

‘नारी समता मंच’ नावातच समतेच्या मूल्याचा उच्चार उद्धृत करण्यात आला आहे. स्त्रियांवरील अत्याचाराला प्रतिबंध इथपासून सुरुवात करून ग्राम विकास, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा अशा अनेक प्रश्‍नांवर मंचाचे काम विस्तारले आहे. कौटुंबिक हिंसाचार, एकतर्फी आकर्षणातून तरुणींच्या हत्या, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ अशा हिंसाचाराच्या अनेक मुद्यांवर मंच कार्यरत आहे. ‘लिंगभाव’ हा कोटीक‘म मूलभूत मानून, त्याचे नातेसंबंधामध्ये विश्‍लेषण आणि त्याविषयी संवेदनशीलता वाढवणे हा मंचाच्या कामाचा गाभा राहिला आहे.

ग्रामविकासाचे कामही लिंगभाव संवदेनशील दृष्टीतून मंचाने पुढे नेले. विविध कार्यक‘म, उपक्रम , प्रकल्प याद्वारे आपल्या बहुपेडी समाजातील विविध स्तरांशी जोडले जाण्याचा नारी समता मंचाचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. स्त्री व पुरुष तसेच आर्थिक, सामाजिक, जातीय परिघाच्या पलीकडे मंच कार्यरत आहे. मंचाची सुरुवात पुणे शहरात जरी झाली असली तरी कामाचा भौगोलिक विस्तारही वेळोवेळी झाला आहे. स्त्री-चळवळ तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी जोडून घेत नारी समता मंचाची वाटचाल सुरु आहे.

पुण्यात समुपदेशन केंद्र तसेच ग्रामीण स्त्रिया आणि पुरुषांसोबत लिंगभाव संवेदनशीलतेसाठी जाणीवजागृतीचे उपक‘म तसेच ग्रामविकास, वंचित समाजातील मुलांचे शिक्षण अशा अनेक माध्यमातून मंचाचे काम पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात सुरु आहे.

मंचाचे प्रतिनिधी सल्लागार /संसाधन व्यक्ती म्हणून आपण खालील बाबीत सहाय्य करू शकता-

लिंगभाव संवेदनशीलता आणि सामाजिक संवेदनशीलता, लिंगभाव संवेदनशील समुपदेशन

कुमार वय – कुमार वयातील ताणतणाव, ताण व्यवस्थापन, करिअर समुपदेशन, लैंगिकता शिक्षण

कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013- कार्यालयीन धोरण, अंमलबजावणी, तक्रारीच्या चौकशीचे प्रशिक्षण, अंतर्गत तक‘ार समितीवर प्रतिनिधित्व

फेसबुक: www.facebook.com/NSMpune

नारी समता मंच, सावली, 473, सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कूल समोरील गल्लीत, पुणे 30.

फोन: 020 24494652, 2447 3116

‘पुरुष उवाच’

स्त्री-पुरुष समतेसाठी

मानवमुक्तीच्या प्रवासातील अविभाज्य भाग म्हणून स्त्रीमुक्ती चळवळ पुढे आली. पुरुषांसाठी मात्र स्त्रीमुक्ती हा चेष्टेचाच विषय राहिला. या पार्श्‍वभूमीवर काही समतावादी पुरुषांनी पुण्यात ‘पुरुष उवाच’ गटाची ऑगस्ट 87 मध्ये स्थापना केली. पुरुषांच्या अधिक चांगल्या, मानवी  जगण्याच्या इच्छांचं प्रतिबिंब म्हणून संवेदनशील पुरुषांचे व्यासपीठ म्हणून ‘पुरुष उवाच’ कार्यरत आहे. वैचारिक व भावनिक जडण घडणीत एकांगीपणा येवू नये म्हणून स्त्री-पुरुष, दोघेही या गटाचे सभासद आहेत.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर सखोल अभ्यास करून स्त्री-पुरुष समतेची जाणीव प्रगल्भ करण्यासाठी, पुरुष उवाच दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी, संध्याकाळी मासिक अभ्यासवर्ग आयोजित करतो. स्त्रियांवर होणार्‍या अत्याचार संदर्भातील कार्यक्रमात सहभाग, तरुण मुलांबरोबरच संवाद असे कार्यक्रम चालू असतात. आपण जरूर यात सहभागी होवू शकता.

2007 पासून आम्ही ‘पुरुष उवाच’ या नावाने दिवाळी अंक काढतो आहोत. ‘पुरुष उवाच’चा दिवाळी अंक ही समतेच्या वाटेवर, निःशब्द ओलांडत, पुरुषांनी माणूसपणाची वाटचाल करण्यासाठीची छोटीशी चळवळ आहे, अशी आमची भावना आहे. या अंकात पुरुषांचेच लिखाण, मते असतात. पुरुषप्रधानव्यवस्थेत दमन, शोषण करणार्‍या पुरुषांचंही माणूसपण हिरावलं जातं, या वास्तवाची जाण जास्तीत जास्त पुरुषांच्या मनात जागी व्हावी आणि त्यांची माणूसपणाची वाटचाल सुकर व्हावी हा प्रयत्न या अंकाच्या माध्यमातून आम्ही करत असतो.

तरुणांनो, आपल्या सहभागाचे स्वागत आहे.

–  मुकुंद किर्दत, गीताली वि.मं.

बी -2/501, कुमार प्राईड पार्क, सेनापती बापट मार्ग, पुणे 411016.

फोन : 020-25652324. इमेल : purushuvachpune@gmail.com

‘अक्षरस्पर्श’ ग्रंथालय

वाचण्यासाठी, त्यावर बोलण्यासाठी

‘पैस’ विस्तारणारी ‘अक्षरस्पर्श’ ग्रंथालयाची वाटचाल

निकोप, निरामय जगण्यासाठीचा एक अवकाश म्हणजे ‘पैस’. सर्वांनीच संवेदनशील जगण्याचा पैस विस्तारत नेणं, स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समता, अशोषण ही मूल्य जपत जगणं. या जाणिवा विकसित होण्यासाठी पुस्तकांचं माध्यम सशक्त सोबत करु शकतं या भूमिकेतून ‘अक्षरस्पर्श’ ग्रंथालय सुरु झालं. श्री. सुनील देशमुख आणि त्यांचे बंधू श्री. किरण देशमुख यांच्या देणगीतून, 3 जाने. 1999 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाची आठवण ठेवत हरि नरके आणि उर्मिला पवार या पाहुण्यांच्या उपस्थितीत ‘अक्षरस्पर्श’ ह्या सुसज्ज ग्रंथालयाचं उद्घाटन झालं.
अक्षरवेल  – सुनीताबाई देशपांडे यांच् ठेवीतून 2001 मध्ये बालविभाग सुरु करण्यात आला. मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी गाणी, गोष्टी, सिनेमा,वाचन अशा ’मूलांना आवडणाऱ्यास्वरूपांमध्ये काही निवडक शाळांमध्ये अक्षरवेल उपक्रम चालू आहे.वर्धापन दिन – वर्धापन दिनाच्या निमित्ताने वाचकांना काहीतरी चांगले ऐकायला मिळावे असा प्रयत्न असतो. वाचक ह्या कार्यक‘मांची प्रत्येक वर्षी आतुरतेने वाट पहात असतात.

पुस्तकपेटी – वाचनालयापासून वंचित अशा समाजाशी जोडले जाण्याच्या विचारातून हा उपक‘म ठिकठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने चालवला जातो. (ज्या कार्यकर्त्यांना आपल्या भागासाठी अशी पुस्तकपेटी हवी असेल त्यांनी ग्रंथालयात जरुर संपर्क साधावा.)

‘अक्षरस्पर्श’ चा एक महत्त्वाचा उपक्रम :‘अक्षरगप्पा’ – वाचकांशी संवाद साधत वाचनसंस्कृती जोपासणं हे तर ‘पैस’ या कल्पनेतील प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पुस्तकांच्या देवघेवीबरोबरच इतर अनेक उपक्रम गेली अठरा वर्षं सुरु आहेत. ‘अक्षरगप्पा’ उपक्रमात अनेक लेखक, कलावंत वाचकांना भेटतात. महत्त्वाच्या पुस्तकांवर चर्चा होतात. वाचकदिन, मुलाखती, अनुभवकथन असे अनेक कार्यक‘म झाले.

रोजच्या जगण्यात बौद्धिक, वैचारिक सुसंवादाची तुमची भूक पुरी करण्यासाठी अक्षरस्पर्श ग्रंथालय उत्सुक आहे. ललित, ग्रामीण , विनोदी, स्त्रीवादी, दलित, वैचारिक, तत्त्वज्ञान, सामाजिक चळवळींचे साहित्य अशी विविधता. मराठी, इंग‘जी आणि हिंदी मधील नवीन पुस्तकं आणि नियतकालिकंही.  हे सारं आपल्या सर्वांच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी उपलब्ध आहे.

40/1/ब, भोंडे कॉलनी, प्राईम फर्निशिंग समोर, कर्वे रोड, पुणे 411 004.

फोन : 2542 4915    वेळ : स. 9.30 ते 1 आणि दु.4 ते 7.30

सखी सार्‍याजणी मंडळ

स्त्री मासिकातून श्रीमती शांताबाई किर्लोस्कर यांच्या संकल्पनेतून 1966 मध्ये सुरु झालेले हे मंडळ, गेली 27 वर्षे मिळून सार्‍याजणी मासिकाला जोडलेले आहे.
मिळून सार्‍याजणी मासिक आणि श्रीमती विद्या बाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बदलत्या कळतील स्त्री प्रश्‍नांच्या मागोवा घेत कार्यक‘माची आखणी केले जाते.

‘वाचा, ऐका, बघा विचार करा’ आणि मु‘य म्हणजे बोला असा एक संदेश प्रत्येक कार्यक‘माच्या मागे असतो. त्यासाठी साहित्य, नाटक, कविता, चित्रपट, स्त्रीवादी साहित्य, समाजकारण, राजकारण, स्त्री विषयक कायदे, पर्यावरण, स्त्री आरोग्य किंवा आपल्या अवती भवती घडणार्‍या घटना यावर वेळोवेळी व्या‘याने व चर्चा आयोजित केल्या जातात.

समाजातील दुर्बल घटकांसाठी निरनिराळ्या ठिकाणी चालणार्‍या कामांना संस्थांना भेट देणे,वार्षिक सहल परगावच्या सखी मंडळासह द्विवार्षिक मेळावे असे कार्यक‘म सभासदांना खूप काही देवून जातात.या सर्वच कार्यक‘मातून सभासदांना नवी उमेद मिळते. सखी मंडळाची सहल व मेळावा ही तर एक आनंद यात्रच असते.

मंडळाची वार्षिक वर्गणी रु.200 अशी आहे. दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी 4.30 टे 6 ‘निवारा’ नवी पेठ किंवा ‘डे .जिम.सोसा. हॉल इथं कार्यक‘म होतात.

संपर्कासाठी:

नीना भेडसगावकर- 24538763 /9822176460

रेखा डांगे – 9890446209