40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

मिसा Online

सस्नेह नमस्कार!

‘मिसा Online’ चा पहिला अंक वाचकांसमोर ठेवताना आम्हांला आनंद तर होतोच आहे, पण त्याचबरोबर या नव्या पावलाने मनात एक मोठं औत्सुक्यही निर्माण केलं आहे. १९८९ साली मुद्रित अंकाच्या स्वरूपात सुरू झालेला ‘मिळून साऱ्याजणी’चा प्रवास विविध वळणवाटांवरून गेला. ३० जानेवारी २०२० रोजी विद्याताईंच्या निधनानंतर या प्रवासाने आणखी एक अवघड वळण घेतलं. विद्याताई आणि त्यांनी त्यांच्या परिश्रमाने जोपासलेला मिळून साऱ्याजणी व इतर सोबती संघटनांचा परिवार हे एक अद्वैताचं नातं आहेच, पण विद्याताई स्वतः कायम पुढे बघणाऱ्या, पुढचा विचार करणाऱ्या, बदलाला तयार असणाऱ्या विचारी कार्यकर्ता आणि माणूस होत्या. त्यांचं जाणं आणि साऱ्याजणीच्या ऑनलाइन अंकाचं येणं हा एक बोलका योगायोग आहे असं आम्हांला वाटतं.

आज डिजिटल माध्यम सर्वव्यापी होत असताना या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या वाचकांपर्यंत, विशेषतः तरूण वाचकांपर्यंत, मिळून साऱ्याजणीचा ठेवा पोचवावा आणि सध्याच्या गतिमान व काहीशा भयचकित करणाऱ्या सामाजिक-राजकीय पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर मिळून साऱ्याजणीने जी मानवीय मूल्ये रूजवण्याचा आजवर प्रयत्न केला ती मूल्ये याही माध्यमावरून रूजवण्याचं काम सुरू ठेवावं हा ऑनलाइन अंक सुरू करण्यामागचा आमचा प्रमुख उद्देश आहे. आज विविध अस्मितांचं प्रकटीकरण हिंसकतेच्या वाटेने होऊ लागलेलं असताना तरूणांमध्ये अहिंसा व शांततामय सहअस्तित्वाच्या मूल्यांची पुनर्स्थापना करणं गरजेचं झालं आहे. त्या दृष्टीने हे माध्यमांतर आम्हांला तरूण वाचकांशी, त्यांच्या जाणिवांशी जोडून घ्यायला आणि त्यांना विधायक आकार द्यायला मदत करेल असा आमचा विश्वास आहे.

‘मिसा Online’ च्या पहिल्या अंकात आम्ही मिळून साऱ्याजणीच्या मुद्रित अंकात पूर्वप्रकाशित झालेले काही लेख प्रकाशित करत आहोत. यापुढील अंकांमधूनही मुद्रित अंकातील जुने लेख आम्ही वाचकांसमोर ठेवणार आहोत. याबरोबरच कालांतराने केवळ डिजिटल अंकासाठी लिहिलेले नवीन लेखही प्रकाशित होतील. डिजिटल माध्यमावरील वाचकवर्ग लक्षात घेऊन हा अंक मराठी आणि इंग्लिश अशा दोन भाषांमधून असणार आहे.

मराठी पत्रकारितेच्या व साहित्याच्या डिजिटल विश्वात या द्वैभाषिक अंकाचं तुम्ही सगळे स्वागत कराल आणि आमच्या यापुढील वाटचालीत आमच्याबरोबर असाल अशी आमची खात्री आहे. यासाठी पहिल्या अंकावरील तुमच्या प्रतिक्रिया (लेखांचं स्वरूप, अंकाची मांडणी या दोन्ही अंगाने) आम्हांला जरूर कळवा. miloonsaryajani@gmail.com या इमेलवर किंवा आमच्या फेसबुक पेजवर तुम्हांला तुमच्या प्रतिक्रिया नोंदवता येतील. डिजिटल अंकातून कोणत्या विषयावरील लेख वाचायला तुम्हांला आवडतील हेही आम्हांला अवश्य कळवा.

या अंकात तुम्हांला खालील लेख वाचायला मिळतील –

  • Women’s organisations in Maharashtra : A brief account
  • सामाजिक संबंधांचा समतोल
  • स्त्री-पुरूष आणि मेंदू
  • ताराबाई शिंदे
  • A mother’s different journey
  • हजार प्रश्नांच्या मुंग्या
  • अभिव्यक्तीच्या साऱ्या जोखमींच्या चौरस्त्यावर
  • एका लेखकाने…
  • The challenges of socially responsible communicator : Advertising in India
  • एक ‘न्यूड’ मुलाखत

माध्यमांतराच्या या प्रयत्नातून तुमच्या-आमच्यातील संवाद अधिक सशक्त होईल या आशेसह,

गीताली वि. मं. 
उत्पल व. बा. 


Dear Readers,

We are extremely happy to introduce the online version of ‘Miloon Saryajani’ – a Marathi monthly magazine being published since 1989. ‘Miloon Saryajani’ was founded by the late Smt. Vidya Bal who was a much-revered figure in the feminist movement of Maharashtra. She was a staunch proponent of gender equality and a visionary who was able to sense the changes in the social fabric. Her willingness and ability to accommodate the changing demands of time was being reflected in the content of the magazine. Our foray into the digital world is the testimony of the vision that she has cultivated in the ethos of Miloon Saryajani.

The first digital issue of मिसा Online – contains some pre-published Marathi and English articles. In due course of time, we will be publishing the articles written especially for the digital issue. Our intention of publishing the bi-lingual issue is to connect with the new set of Marathi and non-Marathi readers bringing them the socially relevant, thought preventing content.

We look forward to having your comments on our first issue. Please share with us your views on the content and visual aspect of it. Also please let us know the topics you would like to see getting covered in the issue. You may send us your response to miloonsaryajani@gmail.com or post it on our Facebook page.

Looking forward to hearing from you,

Geetali V. M.
Utpal V. B.