40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

विद्या बाळ

विद्या बाळ

शिक्षण : बी. ए. ऑनर्स – अर्थशास्त्र / राज्यशास्त्र – १९५८
वूइमेन, मेन अँड डेव्हलपमेंट – ससेक्स विद्यापीठातला एक अभ्यासक्रम – १९८३

व्यवसाय : पत्रकरिता
कार्यानुभव –
– किर्लोस्कर प्रकाशनाच्या ‘स्त्री’ मासिकात २२ वर्ष काम. शेवटी मुख्य संपादकपदाचा राजीनामा देऊन निरोप. (१९६४ – १९८६)
– ऑगस्ट १९८९ मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाची सुरुवात. आज अखेरपर्यंत मुख्य संपादक.
– स्त्री पुरुष समतेच्या विचाराबरोबरच सर्व परिवर्तनवादी चळवळीशी बांधिलकी. आजवर ३० हुन अधिक पुरस्कार मासिकाचा नावावर जमा.

सामाजिक कामातला सहभाग :
– १९८२ – नारी समता मंच या संघटनेची स्थापना. स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात, पुरुष सहभागातून आरंभापासून काम करणारी संघटना. परिषदांमधून प्रबोधन, कार्यशाळातून प्रशिक्षण आणि पुण्यात आणि काही ग्रामीण भागात काम.
– १९८७ ते १९९४ चार खेड्यांसोबत Growing Together या प्रकल्पातून स्त्रियांचा जणीवजागृतीचं काम.
– इच्छामरण या महत्वाच्या विषयावर गेली काही वर्ष एका गटासोबत जनजागरणाचे उपक्रम — पत्रकरिता आणि सामाजिक काम या दोन्हीच्या निमित्ताने श्रीलंका, केनिया, इंग्लंड, अमेरिका, पाकिस्तान या देशातील परिषदांमध्ये सहभाग.

प्रकाशने :
– ३ अनुवादित कादंबऱ्या
– ३ स्फुट लेखनांचे संग्रह
– १ चरित्रलेखन
– ३ संपादित पुस्तक

काही निवडक पुरस्कार :
– फाय फौंडेशन
– शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार
– सुधारककर्ते गोपाळराव आगरकर पुरस्कार यांच्या नावाने ३ वेगवेगळे पुरस्कार
– सह्याद्री वाहिनीचा रत्नदर्पण पुरस्कार
– पॉप्युलेशन फस्टचा लाडली जीवनगौरव
– सामाजिक कृतज्ञता निधी – जीवनगौरव
– महाराष्ट्र फौंडेशन ( यु. एस. ए. ) समाजकार्य जीवनगौरव