40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

संवाद / EDITORIAL

प्रिय वाचक,

केवळ आपला देशच नव्हे तर जगाचा बहुतांश भाग एका अभूतपूर्व परिस्थितीत सापडल्याच्या पार्श्वभूमीवर ‘मिसा Online’ चा एप्रिल अंक तुमच्यासमोर ठेवताना मनात अनेक विचार-भावनांची गर्दी झाली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एकीकडे माणसाला त्याचं पृथ्वीवरील ‘श्रेष्ठ’ स्थान त्याला वाटत होतं तसं ‘श्रेष्ठ’ नाही हे जाणवतंय, तर दुसरीकडे या विषाणूने आपल्या समाजातील अनेकविध अंतर्विरोधही उघड केले आहेत. विशेषतः भारतासारख्या बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक आणि प्रचंड आर्थिक विषमता असलेल्या देशात तर हे अंतर्विरोध प्रखरपणे समोर येत आहेत. हा अंक प्रकाशित होत असताना भारतातील केसेस १६०० च्या वर गेल्या आहेत आणि बळींची संख्या ३८ पर्यंत पोचली आहे. १३२ रूग्ण बरे झाले आहेत आणि आकडा वाढतो आहे ही एक सुखद बाजूही आहे. युरोप आणि अमेरिकेत मात्र कोरोनाचं थैमान भीषण स्वरूपाचं आहे. युरोपात बळींनी ३०००० चा आकडा ओलांडला आहे तर अमेरिकेतील बळींची संख्या ४००० पर्यंत गेली आहे. ९/११ च्या हल्ल्यातील बळींपेक्षा हा आकडा मोठा आहे.

भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत कोरोनाशी युद्ध सुरू आहे. त्यात सहभागी असणारे सर्व मंत्री व शासकीय अधिकारी, संशोधक, डॉक्टर्स, नर्सेस, इतर मदतनीस, वैद्यकीय उपकरणे व टेस्ट किट्सचे निर्माते, सफाई कर्मचारी, पोलीस आणि इतरही अनेक कर्त्या हातांचं स्मरण ठेवणं आणि त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणं हे नागरिक म्हणून आपण लक्षात ठेऊया. कोरोनाशी सुरू असलेलं युद्ध जिंकण्यासाठी सध्या तरी आपण नागरिकांनी ‘घरी बसणं’ आवश्यक आहे. ते आपण कसोशीनं करावं ही विनंती.

‘कोरोना’चा धांडोळा घेणारा विनीता बाळ यांचा अंकातील लेख जरूर वाचा. ‘रोगप्रतिकारशास्त्र’ या क्षेत्रात काम करणाऱ्या विनीता बाळ यांनी कोरोनाशी संबंधित विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण प्रकाशझोत टाकला आहे. छाया कोरेगावकर यांची २०१६ रेऊ कथा स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त कथा ‘ऋणानुबंध’, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त देवकुमार अहिरे यांनी लिहिलेला लेख, प्राजक्ता महाजन यांनी जर्मेन ग्रीअर या स्त्रीवादी अभ्यासकांच्या पुस्तकाचा करून दिलेला परिचय, ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरील विद्याताईंच्या लेखाचा इंग्लिश अनुवाद आणि इतरही सर्व पुनःप्रकाशित लेख तुम्हांला आवडतील अशी आशा आहे.

१४ एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस. विचक्षण बुद्धीमत्ता आणि व्यापक संवेदनशीलता या दोन बलस्थानांच्या आधारे भारतीय इतिहासाला वळण देणाऱ्या हा महामानवाला अभिवादन! दरवर्षी आजच्या दिवशी जागोजागी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. मात्र सध्याच्या अवघड परिस्थितीत घरीच राहून, बाबासाहेबांच्या साहित्याचं वाचन करून  त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त करणं योग्य होईल.

लॉकडाउनमुळे एप्रिलचा मुद्रित अंक प्रकाशित होऊ शकलेला नाही. परिस्थिती स्पष्ट होत जाईल त्यानुसार पुढील अंकाबाबत तुम्हांला सूचित करू.

काळजी घ्या, घरीच राहा!

 

सस्नेह,

गीताली वि. मं.

उत्पल व. बा.

 


 

Dear Readers,

Our mind is filled with an inexplicable mix of thoughts and emotions as we present the third issue of ‘मिसा Online’. not just our nation, but the major part of the world is caught in an unprecedented crisis caused by Coronavirus. On the one hand, the virus has made us question our belief of being ‘the greatest species’ on earth and on the other hand, it has unearthed various internal conflicts in human society, especially in a country like ours where the entire  social structure is marked by plurality of culture, religion and extreme economic disparity. As we bring this issue, number of Corona cases in India have risen above 1600 and death toll is at 38. The silver lining to the cloud is that number of recoveries are also on the rise. It’s already more than 132. However, Corona has caused havoc in Europe and US. Death toll in Europe has crossed 30000 and in the US, it has reached 4000, a number larger than the death toll of 9/11 attacks.

In India, central and state governments are fighting the battle against Corona. As the citizens of the nation, let’s not forget to be thankful to the ministers, government officials, researchers, doctors, nurses, other helpers, producers of medical equipment and test kits, cleaning staff, police and many others. In these times, the best we can do is ‘sit at home’. Let’s do that with all sincerity!

In this issue, do read the article by Vineeta Bal, an expert in immunology. She has discussed multiple aspects related to Coronavirus. Gopal Ganesh Agarkar was an influential 19th century social reformer in Maharashtra. Do check the English version of the article written on him by Vidya Bal. We trust that along with this re-published article, you would enjoy Prajakta Mahajan’s article on Germaine Greer’s book – The Whole Woman, Devkumar Ahire’s article on Dr. Babasaheb Ambedkar’s thoughts on democracy along with other articles and a story by Chhaya Koregaonkar which was among the winners of Reu Story Writing Competition, 2016.

We have not been able to publish the April 2020 print issue of Miloon Saryajani due to the lock-down. We will keep you posted about the next issue as the situation unfolds.

Stay at home & stay safe!

 

With love,

Geetali V. M.

Utpal V. B.