40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

संवाद / Editorial

सप्रेम नमस्कार!

मिसा Online’ चा दुसरा अंक जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून प्रकाशित करताना आम्हांला आनंद होतो आहे. लैंगिक समतेच्या तत्त्वाला अनुलक्षून हे तत्त्व जगण्याच्या सर्वच क्षेत्रात अधिकाधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात कसं आणता येईल हा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी #EachforEqual हे विषयसूत्र निवडण्यात आले आहे. त्याचबरोबर १९९५ मध्ये बीजिंग येथे झालेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला (या परिषदेचा जगभरातील स्त्रियांसाठीचा तोपर्यंतचा सर्वाधिक भविष्यलक्षी, समग्र जाहीरनामा जगातील १८९ देशांनी मान्य केला होता) २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाने #GenerationEquality या मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमांचा भाग होऊन आपणही लैंगिक समतेच्या तत्त्वाला आपला पाठिंबा नोंदवूया.

मिसा Online च्या या अंकात ‘मिळून साऱ्याजणी’मध्ये पूर्वप्रकाशित झालेले काही लेख तुम्हांला वाचायला मिळतील. डॉ. प्रतिभा कणेकर यांचा ‘सिंड्रेला कॉम्प्लेक्स’वरील लेख स्त्री-पुरूष वाचकांना एक नवं आकलन घडवणारा आहे. मंगला सामंतांचा लेख सध्याच्या धार्मिक दुफळीच्या पार्श्वभूमीवर एक संपूर्ण नवीन, समावेशक दृष्टी देणारा आहे. मंगला गोडबोले यांनी त्यांच्या नेहमीच्या मार्मिक शैलीत गृहिणींचं विश्व चितारताना ‘गृहिणीला गृहीत धरण्याच्या’ समाजाच्या मनोवृत्तीवर तीक्ष्ण प्रहार केले आहेत. इंद्रजित खांबे या सध्याच्या आघाडीच्या छायाचित्रकाराचा लेख ‘मर्द को दर्द होता है’ म्हणत एक अतिशय महत्त्वाचं विधान करतो आहे. विनीता बाळ यांचा लग्नाआधीच्या शरीरसंबंधांविषयीचा लेख तरूणांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. अपर्णा रामतीर्थकर यांच्या विधानांमुळे समाजमाध्यमांमध्ये अलीकडे बरीच चर्चा झाली. विद्याताईंनी गेल्या वर्षीच्या मार्चच्या अंकात अपर्णाताईंना एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र या अंकात तुम्हांला वाचायला मिळेल.

इंग्लिश लेखांमध्ये रिया शर्मा या तरूण लेस्बियन मुलीचं धीटपणाने आणि त्याच वेळी संयतपणे, विचारपूर्वक केलेलं अनुभवकथन एका नव्या जगाची खिडकी खुलं करणारं आहे. वंदना भागवत यांची ‘मिल्स अँड बून’ ही कथा आपलं नाव किती सार्थ करते आहे हे कथा वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल! प्रदीप पाटकरांचा पुरुषांच्या मेनोपॉजबाबतचा लेख पितृसत्ताक पद्धतीत घडलेल्या पुरूषाच्या अडचणी सांगतो आहे. मनीषा गुप्ते यांच्या दीर्घ शोधनिबंधातील भाग आपल्या अवतीभवतीच्या समाजाचं विषण्ण करणारं चित्र वस्तुनिष्ठपणे आपल्यासमोर ठेवतो आहे.

अंकाविषयी तुम्हांला काय वाटलं हे ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. अंकावरील प्रतिक्रिया आणि अंकाकडूनच्या अपेक्षा  miloonsaryajani@gmail.com या इमेल आयडीवर जरूर कळवा.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छांसह,

गीताली वि. मं. 

उत्पल व. बा. 

 


 

Dear Readers,

We are glad to present the second installment of ‘मिसा Online’ right before the International Wone’s Day. Today, it has become absolutely essential for all of us to acknowledge and exercise the principle of gender equality in all walks of life. In sync with this objective, the theme for this year’s women’s day has been decided as #EachforEqual. Moreover, to celebrate the silver jubilee of Beijing Conference, which presented the most comprehensive declaration of women rights which was signed by 189 nations, UN Women’s #GenerationEquality campaign highlights the advent of the generation that is has inculcated the idea of equality. Let’s be part of these movements and express our support to the principle of gender equality.

The March issue of ‘मिसा Online’ presents some of the pre-published articles along with a fresh article by Riya Sharma, a young lesbian from Mumbai. Her fearless and thoughtful account of her journey would open a window to a new world. Vandana Bhagwat’s story ‘Mills and Boon’ makes us appreciate the title after reading it and Manisha Gupte’s piece from her research paper opens our eyes to a disturbing reality. Marathi section has an important article about Cinderella Complex. Mangala Samant’s article directs our vision to an entirely new, enriching possibility on the backdrop of prevailing religious tension today. Recently, Marathi section on social media was quite abuzz about Aparna Ramteerthkar owing to her questionable remarks on women. Vidyatai (Vidya Baal) had written an open letter to her in last year’s March issue. It is being published in this issue.

Do let us know what you think about this issue and also your expectations from the issue. You can write to us on miloonsaryajani@gmail.com .

Happy reading and best wishes for Women’s Day!

 

Geetali V. M.

Utpal V. B.