
मिळून साऱ्याजणी
तुम्हा -आम्हाला हवाहवासा वाटणारा एक जीवनावश्यक झरा म्हणजेच 'मिळून साऱ्याजणी ' हे मासिक. कथा, कविता, विचारप्रवर्तक आणि ललित लेख आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून जीवनाचा अर्थ शोधताना आलेल्या आणि घेतलेल्या अनुभवांची आत्मकथनं - हे सगळं तुमच्यापर्यंत पोचवणारा एक जिवंत झरा तुम्हाला या मासिकात भेटेल याचा विश्वास वाटतो.
'मिळून साऱ्याजणी ' चा पहिला अंक ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिद्ध झाला. हे मासिक मुख्यतः स्त्रियांसाठी हे तर खरंच तरीपण हे 'त्या' अर्थानं बायकी नाही. सुजाण आणि संवेदनशील पुरुषांनाही हे वाचायला नक्की आवडेल याची खात्री आहे.