मिसा Online
प्यार पे चर्चा!
नमस्कार!
'नेमेची येतो' या धर्तीवर १४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे - येतो आणि 'प्रेम' या विषयावरील चर्चेला धुमारे फुटण्याचं एक वार्षिक निमित्त मिळतं. खूप जुना असला तरी कधीच जुना न होणारा विषय म्हणजे प्रेम - अर्थातच 'रोमँटिक प्रेम'. कारण प्रेमाच्या इतरही अनेक छटा असल्या तरी रोमँटिक प्रेमाला माणसाच्या भावविश्वात, एकूणच मानवी संस्कृतीत एक खास जागा आहे. या प्रेमाचे आविष्कार, त्यातून निर्माण होणारे संघर्ष हे सगळं एका बाजूने स्त्री-पुरुषांमधील आदिम नात्याचं एक अविरतपणे प्रकट होणारं रूप आहे आणि दुसऱ्या बाजूने हा एक मानसशास्त्रीय, शरीरशास्त्रीय अभ्यासाचा विषयही आहे.
तर येत्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाविषयी, सहजीवनाविषयी, त्यातील मानसिक व शारिरीक गुंतवणुकीविषयी आणि मुख्य म्हणजे आजच्या गतिमान जगण्यात प्रेमात बदलत्या संदर्भांविषयी आपल्याला काही महत्त्वाचं गवसतंय का याचा शोध घेऊया 'मिळून आऱ्याजणी'च्या फेब्रुवारी २०२० च्या अंकात. यासंदर्भात खाली काही दिशादर्शक प्रश्न दिले आहेत. या प्रश्नांच्या अनुषंगाने किंवा स्वतंत्रपणे तुमच्या मनातील विचारांच्या अनुषंगाने सुमारे ४०० ते ५०० शब्दांतलं टिपण ५ जानेवारीपर्यंत saryajani@gmail.com या आमच्या इमेल आयडीवर पाठवा. निवडक टिपणांना फेब्रुवारी २०२० च्या अंकात स्थान दिलं जाईल.
- रोमँटिक प्रेम या भावनेचं नियमन करण्यापेक्षा दमन करण्याकडे समाजाचा, संस्कृतीच्या कल राहिला आहे असं वाटतं का?
- दुसऱ्या बाजूने पाहता या भावनेचं अवाजवी उदात्तीकरण केलं जातं असं वाटतं का? थोडक्यात 'प्रत्यक्षात दमन, पुस्तकात उदात्तीकरण' असं काही चित्र दिसतं का?
- प्रेम या भावनेची अनुभूती आणि प्रेमाचं प्रकटीकरण याबाबत काही ठळक निरीक्षणं / कालसापेक्ष फरक अधोरेखित करावेसे वाटतात का?
- पारंपरिक दृष्टीने पाहता विवाह ही प्रेमाची सुखद परिणती आहे. या चित्रात आज काही बदल झाला आहे असं वाटतं का? विवाहाची अपरिहार्यता कमी झाली आहे असं वाटतं का?
- प्रेमाची पूर्तता होण्यासाठी सहजीवनाची कुठली मॉडेल्स यापुढे प्रभावी ठरतील असं वाटतं?
- प्रेम या जाणिवेबाबतचं आकलन अधिक प्रगल्भ व्हायची गरज आहे का? त्यासाठी काय करावं लागेल?
- सध्या चर्चेत असणाऱ्या 'लव्ह जिहाद'बाबत तुम्हांला काही मांडावंसं वाटतं का?
धन्यवाद,
संपादक
विद्याविचार साखळी
'विद्याविचार साखळी' या नावावरून तुमच्या हे लक्षात आलं असेलच की, आपल्याला विद्याताईंचे विचार सर्वांपर्यंत पोचवायचे आहेत. तेही वेगवेगळ्या माध्यमातून. ते कसं? तर आम्हाला माहिती आहे की आपल्या या परिवारातल्या प्रत्येकाकडे काही ना काही कलागुण आहेत. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे, अनेक जण तर आपापल्या क्षेत्रात मास्टर आहेत. तुम्हाला तुमच्या या कलेचा उपयोग करून विद्याताईंचा विचार सांगायचा आहे. उदा. कोणी उत्तम अभिवाचक असतील ते अभिवाचन करून विचार सांगतील. कोणी चित्रकार असतील ते चित्र काढतील, कोणी गायक असतील ते गाण्यातून विचार मांडतील, कोणी वक्ते असतील, कोणी छान रांगोळी काढत असेल, कोणी अजून काही.... अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विद्याताईंच्या विचारांची मांडणी करायची आहे.
विद्याताईंचे अनेक विचार, विविध मुद्द्यांवर त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेली मतं आपल्या प्रतिनिधी सुनीता भागवत यांच्याकडे संग्रहित आहेत.. त्याचा आपण जरूर वापर करू शकता. यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा. ज्या विशिष्ट कलेच्या माध्यमातून तुम्हाला विचार पोचवायचा आहे त्यानुसार विद्याताईंचे विचार पाठवले जातील. पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कृपया प्रत्येकाने खालील क्रमांकावर संपर्क करावा.
यामध्ये काय काय असू शकेल? तर विद्याताईंचे विचार, मतं, विद्याताईंच्या पुस्तकांचे अभिवाचन/अभिप्राय/परिचय, विद्याताईंच्या फोटोचे सादरीकरण, विचारांना घेऊन काढलेले चित्र, पोस्टर, विद्याताईंबरोबरच्या आठवणी, अॅनिमेशन, रांगोळीतून सादरीकरण असं बरंच काही.
खालील सूचना कृपया लक्षात घ्याव्यात -
- तुम्हाला तुमच्या अभिव्यक्तीचा व्हिडिओ तयार करायचा आहे. व्हिडिओ स्पष्ट असावा.
- कुठल्याही कलात्मक अभिव्यक्तीसाठी जास्तीत जास्त ३ विचार घ्यावेत.
- व्हिडिओचा कालावधी हा जास्तीतजास्त ५ मिनिटे असावा.
- प्रत्येकाने व्हिडिओच्या सुरवातीला आपली ओळख सांगावी. (नाव, गाव, वय, व्यवसाय व कलेविषयी)
- विचारांचं अभिवाचनही चालेल.
- व्हिडिओ पाठवताना तुमचे नाव, गाव, वय, संपर्क क्रमांक, इमेल आयडी लिहायला विसरू नका.
- हे सर्व व्हिडीओ मिळून साऱ्याजणीच्या यूट्यूब चॅनेलवर आणि इतर सोशल मीडियावर पोस्ट केले जातील.
या उपक्रमात नक्की सहभागी व्हा! विद्याविचार साखळीत आजवर आलेले व्हिडीओज पाहण्यासाठी मिळून साऱ्याजणीच्या यूट्यूब चॅनेलला जरूर भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राइब करा.
https://www.youtube.com/c/MiloonSaryajani/videos
गीताली वि.मं.
(संपादक, मिळून साऱ्याजणी)
रसिका भट-लिमये
(माध्यम संवादक, मिळून साऱ्याजणी)
अधिक माहितीसाठी व व्हिडिओ पाठवण्यासाठी संपर्क-
रसिका भट-लिमये
फोन - 9657470920, 7972196345 .
इमेल - rasikabhar2692@gmail.com
मिसा वाचक कट्टा
नमस्कार!
मिळून साऱ्याजणी'ने गेल्या ३० वर्षात अनेक साहित्यिक आणि समविचारी मंडळी जोडलेली आहेत. त्याशिवायही विविध क्षेत्रात कार्यरत असलेली पण स्त्रीवादी विचारसरणीशी, स्त्री-पुरुष समता जपणारी, साहित्याशी नाळ जुळलेली रसिक मंडळी सर्वत्र आहेत. अशा समविचारी लोकांना एकत्र आणून सकस विचार समाजात पेरले जावेत आणि विविध प्रकारच्या साहित्याची देवाण-घेवाण व्हावी या विचाराने 'मिळून साऱ्याजणी'ने ऑगस्ट २०२१ मध्ये 'मिसा वाचक कट्टा' या व्हॉट्सअॅप ग्रुपला सुरुवात केली आणि बघता बघता एक ग्रुप पूर्ण झाला म्हणून दुसराही सुरू करण्यात आला! या ग्रुपच्या माध्यमातून मिसाचे साहित्य व इतरांच्या स्वरचित साहित्याची देवाण-घेवाण होते, लेखनासाठी विषय दिले जातात, विविध विषयांवर चर्चा होते, वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आठवड्याचे सात दिवस विविध कार्यक्रम राबवले जातात. वाचक वर्ग यात उत्साहाने सहभागी होतो.
तुम्हालाही या कट्ट्याचे सभासद होता येईल. संपर्क - ७४४७४ ४९६६४
‘मिळून साऱ्याजणी'चं सामाजिक पालकत्व
नमस्कार!
गेल्या अनेक वर्षांपासून जागरूक पालकत्वाबद्दल सातत्याने विचार होत तो कृतिशीलतेच्या पातळीवर काही प्रमाणात स्थिरावतानाही दिसतो. सामाजिक पालकत्वाबद्दल बोलण्याचेही काही प्रयत्न होताना दिसतात. हे प्रयत्न प्रामाणिकपणे होताना दिसतात हे जरी खरे असले तरी अजूनही त्याचे केंद्र शहरी उच्चवर्णीय मध्यमवर्ग आहे. त्यामुळे सामाजिक पालकत्वाच्या चर्चांमधून मुलांना सामाजिक जबाबदाऱ्यांचे भान देणे, समाजातील वंचित समूहांची ओळख करून देणे, संवेदनशीलपणे दुर्बल घटकांसोबत वागायला शिकवणे असे सहृदयी पालकत्वाचे प्रयत्न आणि प्रयोग व्हावेत यासाठी मिळून साऱ्याजणीने सामाजिक पालकत्व विभागाची सुरुवात केली आहे. समाजभान आणि पालकत्व यातील संबंध समजून घेणे आणि त्यातील विविध पैलूंवर तपशीलवार आणि सातत्याने सुदृढ, सकारात्मक चर्चा घडून आणणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी या विभागाचे मार्गदर्शक आहेत. व्हॉट्सअॅपवर यासंदर्भात एक ग्रुपही सुरु केला गेला आहे. त्यावर समाजभान निर्माण होण्यासाठी पूरक असे लेख पोस्ट केले जातात. त्यातील निवडक लेख दर महिन्याच्या मिळून साऱ्याजणीच्या अंकात सामाजिक पालकत्व विभागाअंतर्गत प्रसिद्ध केले जातात.
स्त्रियांचे नाते : जमिनीशी आणि पाण्याशी
स्त्रीवादाची विचारप्रणाली आणि स्त्री-प्रश्नाचे धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय आयाम विस्ताराने मांडणारा हा बृहदग्रंथ स्त्रीवादाबाबत जिज्ञासा असणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही असायला हवा.
JGOERJOYHJEROJJE
बापलेक नात्याचा कॅलिडोस्कोप
स्त्रीवादाची विचारप्रणाली आणि स्त्री-प्रश्नाचे धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय आयाम विस्ताराने मांडणारा हा बृहदग्रंथ स्त्रीवादाबाबत जिज्ञासा असणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही असायला हवा.
पुस्तकांसाठी संपर्क
- मिळून साऱ्याजणी कार्यालय
- ०२० – २५६५ ३९३८/ + ९१ ७४४७४ ४९६६४
स्वातंत्र्यपूर्व संध्या
स्त्रीवादाची विचारप्रणाली आणि स्त्री-प्रश्नाचे धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय आयाम विस्ताराने मांडणारा हा बृहदग्रंथ स्त्रीवादाबाबत जिज्ञासा असणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही असायला हवा.
पुस्तकांसाठी संपर्क
- मिळून साऱ्याजणी कार्यालय
- ०२० – २५६५ ३९३८/ + ९१ ७४४७४ ४९६६४
लैंगिक धर्म - व्यक्त आणि अव्यक्त
स्त्रीवादाची विचारप्रणाली आणि स्त्री-प्रश्नाचे धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय आयाम विस्ताराने मांडणारा हा बृहदग्रंथ स्त्रीवादाबाबत जिज्ञासा असणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही असायला हवा.
पुस्तकांसाठी संपर्क
- मिळून साऱ्याजणी कार्यालय
- ०२० – २५६५ ३९३८/ + ९१ ७४४७४ ४९६६४
शाश्वत विकासाचे वाटाडे
स्त्रीवादाची विचारप्रणाली आणि स्त्री-प्रश्नाचे धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय आयाम विस्ताराने मांडणारा हा बृहदग्रंथ स्त्रीवादाबाबत जिज्ञासा असणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही असायला हवा.
पुस्तकांसाठी संपर्क
- मिळून साऱ्याजणी कार्यालय
- ०२० – २५६५ ३९३८/ + ९१ ७४४७४ ४९६६४
रिवायत
पुस्तकांसाठी संपर्क
- मिळून साऱ्याजणी कार्यालय
- ०२० – २५६५ ३९३८/ + ९१ ७४४७४ ४९६६४
संदर्भांसहित स्त्रीवाद
स्त्रीवादाची विचारप्रणाली आणि स्त्री-प्रश्नाचे धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय आयाम विस्ताराने मांडणारा हा बृहदग्रंथ स्त्रीवादाबाबत जिज्ञासा असणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही असायला हवा.
पुस्तकांसाठी संपर्क
- मिळून साऱ्याजणी कार्यालय
- ०२० – २५६५ ३९३८/ + ९१ ७४४७४ ४९६६४
यूथ कनेक्ट
युथ कनेक्टच्या उप्रक्रमाची माहिती. सामील होण्याचं तरूणांना आवाहन. सामील होण्याचं तरूणांना आवाहन. फोटो. युथ कनेक्टच्या उप्रक्रमाची माहिती. सामील होण्याचं तरूणांना आवाहन. फोटो. युथ कनेक्टच्या उप्रक्रमाची आवाहन. फोटो. युथ कनेक्टच्या उप्रक्रमाची माहिती. सामील होण्याचं तरूणांना आवाहन.