संकल्पना टिप्पणी
जागतिक महिला वर्षाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीत स्त्री चळवळीचं योगदान .....
यूनोनं १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केलं त्याला २०२५ मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होतील, त्यानिमित्त १९७५ ते २०२५ या ५० वर्षात महिलांसंदर्भात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, कायदे, कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, पर्यावरण, उद्योग आदी क्षेत्रात विशेषतः महाराष्ट्रात काय काय महत्वाच्या ठळक घटना, घडामोडी झाल्या त्याचा सामान्य स्त्री, पुरुष आणि एल.जी.बी.टी.आय.क्यू.प्लस या सर्वांवर काय परिणाम झाला याचा सखोल आणि सम्यक वेध घेणारा व्यापक अभ्यास विद्या बाळ अध्यासन प्रकल्प २ अंतर्गत मिळून साऱ्याजणी मासिक हाती घेत आहे.
या प्रकल्पामध्ये सामान्य माणस केंद्रस्थानी असणार आहेत. त्यामुळे पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था म्हणजे काय? तसंच या व्यवस्थेत स्त्री प्रश्न म्हणजे काय, व्यवहारात त्याचं रूप कस आहे? स्त्री प्रश्न सोडवण्यात स्त्री चळवळ, स्त्री अभ्यासानं कसा हातभार लावला असं त्यांना वाटतं? मुळात स्त्री चळवळ, स्त्री अभ्यास त्यांच्या पर्यंत पोहोचला आहे का? या व्यवस्थेत स्त्री प्रश्नाची दुसरी बाजू म्हणजे पुरुष प्रश्न आहे याविषयी त्यांना काय वाटत? इत्यादी इत्यादी अनेक प्रश्न असतील मध्यम, उच्च मध्यम, निम्न मध्यम वर्गातले ग्रामीण आणि शहरी भागातले तसेच ज्येष्ठ मध्यमवयीन आणि तरुण अशा सर्व स्तरांतले स्त्री, पुरुष आणि एल.जी.बी.टी.आय.क्यू.प्लस यांच्याकडून सविस्तर प्रश्नावली भरून घेणे हा एक फार मोठा महत्त्वाचा भाग हा प्रकल्प व्यापणार आहे. प्रश्नावली भरून झाल्यावर पुढील टप्प्यात प्रश्नावली मधील आशयाचे विश्लेषण अनुभवी कार्यकर्ते, स्त्री चळवळीचे अभ्यासक आणि तज्ञ मंडळीकडून केलं जाईल. ते वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध असेल.
पार्श्वभूमी
१९७५ साली संयुक्त राष्ट्र संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला वर्षांची घोषणा. पहिली मीटिंग मेक्सिको येथे १९ जून ते २ जुलै यादरम्यान झाली. तिथे मांडलेली उद्दिष्टे.
UN declaration. Obectives:
* लिंगभेदाचे संपूर्ण उच्चाटन घडवणे आणि लिंग समानता अस्तित्वात आणणे (लिंगभाव?)
* विकासात महिलांना पूर्णपणे सहभागी करणे.
* जागतिक शांतता बळकट करण्यासाठी महिलांचे योगदान.
* समानतेच्या दिशेने, १९७४ साली प्रसिद्ध झालेला रिपोर्ट. फुलरेणू गुह, लोतिका सरकार, वीणा मजुमदार
इ. १० जणांची कमिटी. त्यांनी काय उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन रिपोर्ट लिहिला?
विविध क्षेत्र

स्त्री प्रश्नाची कहाणी...
हजारो वर्ष चालत आलेल्या स्त्री-प्रश्नाच्या मुळाशी असणाऱ्या पितृसत्ताक पुरुष प्रधान व्यवस्थेला नेस्तनाबूत करण्यासाठी धक्के देण्याच्या कामानं 1975 सालापासून गती घेतली. कारण हे वर्ष यूनोनं महिला वर्ष म्हणून जाहीर केलं होतं. या व्यवस्थेत लिंगाधिष्ठीत श्रम विभागणी आणि योनीशुचितेचं अवडंबर माजवत स्त्रीला दुय्यम लेखलं गेलं आहे .स्त्रीच्या या दुय्यमत्त्वाचे नानाविध ऐतिहासिक अविष्कार राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण, अर्थकारण, शिक्षण, आरोग्य इ. इ. क्षेत्रात प्रतिबिंबित होतात.या क्षेत्रांमध्ये अनेकानेक वर्ष काम करणाऱ्या, अभ्यास - चिंतन, मनन करणाऱ्या साऱ्याजणीच्या स्नेहींनी स्त्री प्रश्नाची ही कहाणी अलवारपणे उलगडून दाखवली आहे.